गंगापूर, (प्रतिनिधी): शिवसेना (उबाठा) गटांचे दोन माजी नगरसेवक आणि एक सामाजिक कार्यकर्ता व काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष तथा गंगापूर शहराध्यक्ष यांचा आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला.
गंगापूरमध्ये शिवसेना (उबाठा ) गटाचे शहरप्रमुख आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक दोन एक सामाजिक कार्यकर्ता यांच्यासह सुद्धा भाजपात आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत ऊबाठा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपत जाहीर प्रवेश केला. शहरांमध्ये काही दिवसापासून उबाठा गटाचे शहरप्रमुख -भाग्येश गंगवाल, विजय पानकडे आणि आबासाहेब शिरसाट शेवटी प्रवेश करावा लागला अशी चर्चा शहरात होत आहे.
त्यामुळे गंगापूर शहरात सोमवारी मोठा राजकीय उलथापालथ घडली आहे. आ. प्रशांत बंब आता नगराध्यक्ष पद कोणाला देणार अशी चर्चा सुरू आहे. शहरात भाजपचे नगराध्यक्ष पदाचे दावेदार माजी नगरसेवक पाटील यांनी उमेदवारी मिळण्याची चर्चा शहरात होत आहे. या प्रवेशामुळे गंगापूरमधील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा राजकीय बळकटीचा फायदा मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. आमदार प्रशांत बंब यांनी या वेळी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेसाठी काम करण्याचे आवाहन केले.












